
नवी दिल्ली: दसऱ्याच्या मुहूर्तावर आज जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक असलेलं राफेल लढाऊ विमान भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात दाखल झालं. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून पहिलं राफेल विमान स्वीकारलं. फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईतळावर हवाईदलप्रमुख राफेल हस्तांतरणाचा सोहळा पार पडला.
यावेळी बोलताना राजनाथ यांनी भारतासाठी हा ऐतिहासिक दिन असल्याचे सांगितले. आज भारतात सर्वत्र विजयादशमी साजरी होत आहे. अपप्रवृत्तींचा विनाश करून सत्प्रवृत्तीचा विजयोत्सव साजरा करण्याचा हा दिवस आहे. योगायोग म्हणजेच आजच वायुसेना दिनही आहे. अशा या शुभदिनी राफेल भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात येत असून हवाईदल यामुळे अधिक शक्तिशाली होणार आहे, असा विश्वास राजनाथ यांनी व्यक्त केला.
आज दसऱ्याच्या मुहूर्तावर भारताने शस्त्र पूजा केली असेच म्हणावे लागेल.






