एक्झिट पोल नुसार परत एकदा भाजपा-सेना युतीचंच सरकार

मुंबई: विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार परत एकदा भाजपा आणि शिवसेना महायुतीलाच बहुमत मिळेल असे सर्वेक्षणात पुढे येत आहे. विविध वृत्तवाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थामार्फत वर्तवलेले अंदाज खालील प्रमाणे.

  • टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार, युतीला मिळणाऱ्या २३० जागांपैकी १३० भाजपच्या तर १०० जागा शिवसेनेच्या असतील
  • टीव्ही ९ मराठीच्या एक्झिट पोलनुसार, राज्यात युतीला १९७ जागा मिळतील तर आघाडीला ७५ जागा मिळतील
  • सीएनएन-न्यूज १८ च्या एक्झिट पोलनुसार, शिवसेना-भाजप युतीला २४३ जागा तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ४१ जागा
  • इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्यानुसार, महाराष्ट्रात शिवसेना-बीजेपी युतीला ४५ टक्के, काँग्रेस-एनसीपी आघाडीला ३५ टक्के तर अन्य पक्षांना २० टक्के मते मिळण्याची शक्यता
  • एबीपी न्यूज-सीवोटरच्या एक्झिट पोलनुसार, युतीला २०४ तर आघाडीला ६९ जागा
  • जन की बातच्या एक्झिट पोलने युतीला दिला २२३ जागांचा कौल तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पारड्यात दिल्या ५४ जागा