
मुंबई: भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले तसेच या निवडणुकीत सर्वात जास्त जनसमर्थन हा भाजपाला आहे कारण या निवडणुकीत कमी जागा लढवून चांगल्या जागा जिंकल्या आहेत त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे असेही फडणवीस म्हणाले. गेल्या पाच वर्षांत आम्ही जे काम केले त्यापेक्षा अधिक चांगेल काम करण्याचा आमचा आता प्रयत्न राहणार आहे. एक भक्कम सरकार आम्ही देणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी फॉर्मुल्याची आठवण करून देत सत्तेत समान वाटा मिळायला हवा ही मागणी रेटली आहे. त्याकडे लक्ष वेधले असता ‘आमचं जे ठरलं आहे त्यानुसारच आम्ही पुढे जाणार आहोत’, असे फडणवीस म्हणाले.
निवडून आलेल्या बंडखोरांपैकी १५ आमदार महायुतीसोबत येणार असल्याचा दावाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.






