
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची पुढची वाटचाल काय असेल याविषयी भाष्य केले. ही निवडणूक आमच्यासहित सर्वच राजकीय पक्षाच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे, या निकालामुळे सर्वच राजकीय पक्षांचे डोळे उघडले असतील. तसेच महाराष्ट्राच्या जनतेला आभार कारण त्यांनी सगळ्यांना खाली जमिनीवर आणलं आहे, असंही उध्दव ठाकरे म्हणाले.
दरम्यान मुख्यमंत्री पदावरून भाजपा शिवसेना यांची जुंपणार हे स्पष्ट झालं आहे. सत्ता स्थापनेची सध्या घाई नाही, सर्वं पर्याय उपलब्ध आहेत असे सांगून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काय राहील हे स्पष्ट केले तसेच आपणच किंग मेकर ठरणार. भाजपा आणि शिवसेना यांच्या दोन्हीही बाजूने ज्येष्ठ नेते चर्चा करून लोकसभेच्या वेळी ठरलेल्या फॉरमूल्यावर निर्णय होईल असे ठाकरे म्हणाले.






