भाजपाच्या विधीमंडळ नेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

मुंबई: भाजपाने आज विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते निवड केली. चंद्रकांत पाटील यांनी ठेवलेल्या प्रस्तावास 11 आमदारांनी अनुमोदन दिले आणि गटप्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड केली.

भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीसयांची निवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी निवडणुकीआधीच, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आज, प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकात पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि राधाकृष्ण विखे-पाटील, हरिभाऊ बागडे, सुधीर मुनगंटीवार, शिवेंद्रराजे भोसले, देवयानी फरांदे, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, आशीष शेलार, संजय कुटे, गणेश नाईक यांनी त्याला अनुमोदन दिलं.