व्होडाफोन भारतातून गाशा गुंडाळणार?

मुंबई: काही दिवसांपूर्वी व्होडाफोन आणि आयडीया मोबाईल सेवा कंपनी एक होवून देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली होती आणि आता मात्र आर्थिक मंदीचा फटका व्होडाफोन कंपनीला बसला आहे. कंपनी आर्थिकदृष्ट्या संकटात असून कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याची शक्यता आहे असे खात्रीशीर सूत्रांकडून समजते. सदर रिपोर्ट हा IANS या न्यूज एजन्सी मार्फत देण्यात आला आहे.

रिलायन्स जिओ भारतात चालू झाल्यानंतर आयडीया आणि व्होडाफोन एकत्र होवून काम करीत होत्या. रिपोर्ट नुसार व्होडाफोन कंपनीच्या ओपेशनल लॉस मध्ये सतत वाढ होत आहे याशिवाय कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन मध्ये सुद्धा खाली घसरण होत आहे आणि त्यामुळेच वोडाफोनने भारतातून पॅकअप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे आर्थिक नुकसान जून 2019 मध्ये चार हजार कोटी रुपयांचा वर होता जो वर्ष2018 पेक्षा दुप्पटीने वाढला आहे.