
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली असून दिल्लीत आरोग्य आणीबाणी जाहीर करावी लागली आहे. दिल्लीतील शाळा पाच नोव्हेंबर पर्यंत बंद असणार आहेत तसेच फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. दिल्ली सरकारने मोटर वाहनांसाठी ऑड इव्हन फॉर्म्युला लागू केला असून केंद्र शासनाने त्वरित या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.






