
मुंबई: अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी तातडीची मदत म्हणून १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.
येत्या २ ते ३ दिवसांमध्ये नुकसान भरपाईबाबतचा अंतिम निर्णय घेऊन मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना जास्तीतजास्त नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न असून वर्गवारी नुसार मदतीची रक्कम निश्चित केली जाईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.






