
नवी दिल्ली: कलम 370 रद्द करून जम्मू आणि काश्मीर राज्यांची निर्मिती तसेच लडाख या केन्द्र शासित प्रदेशांची निर्मिती झाल्यानंतर केंद्र शासनाने शनिवारी नवीन नकाशा जारी केला. नव्याने निर्मिती करण्यात आलेल्या जम्मू-काश्मीर व लडाख यांचे नकाशे, तसेच या केंद्र शासित प्रदेशांचा समावेश असलेला भारताचा नकाशा जारी केला. लडाखच्या केंद्रशासित प्रदेशात कारगिल व लेह या दोन जिल्ह्यांचा समावेश असून, यापूर्वीच्या जम्मू व काश्मीर राज्याच्या उर्वरीत भाग जम्मू-काश्मीर या केन्द्र शासित प्रदेशात समाविष्ट आहे.






