
मुंबई: मुंबई, ठाणे , पालघर आणि नवी मुंबईतील अनेक भागात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगटासहित जोरदार पाऊस पडला आहे. पहाटे सुरू झालेला पाऊस जवळपास तासभर पडला.

पावसामुळे मध्य रेल्वे 20 ते 25 मिनिटे उशीराने धावत असून ट्रान्स हार्बर मार्गावर रबाले स्थानकात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.






