उद्या अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालय निर्णय सुनावणार

नवी दिल्ली: चाळीस दिवस नॉन स्टॉप सुनावणी झाल्यानंतर उद्या अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयामार्फत निकाल लागणार आहे. देशभरात निकालाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. राम मंदिर प्रश्न कसा सुटणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. सकाळच्या 10 ते 11च्या सुमारास सुप्रीम कोर्टामार्फत निकाल येण्याची शक्यता आहे. जनतेने संयम पाळावा व शांतता ठेवावी तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे शासनाने आवाहन केले आहे.