शिवसेना एनडीए मधून बाहेर पडणार?

मुंबई: राज्यात भाजपसोबत शिवसेनेने फारकत घेतली आहे. केंद्रातल्या एकमेव मंत्रिपदाचाही शिवसेनेकडून राजीनामा देण्यात आला आहे. पण एनडीएतून बाहेर पडण्याची आता फक्त औपचारिकता बाकी असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केल्यामुळे भाजप आणि शिवसेना यांची ३० वर्षांची युती संपुष्टात आल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

राजधानी दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. एनडीएतील सर्व घटकपक्षांना याचं निमंत्रण आहे, पण शिवसेनेला याचं निमंत्रण मिळालेलं नाही. 

शिवसेनेचे लोकसभेतील खासदार आणि गटनेते विनायक राऊत यांनीही याबाबत माहिती दिली. ‘शिवसेनेला एनडीएच्या बैठकीला आमंत्रण दिलेलं नाही, त्यामुळे जाण्याचा प्रश्नच नाही. लोकसभा अध्यक्षांच्या बैठकीला जाणार आहोत, आम्ही बाहेर पडण्याबाबत अजून कुठेही जाहीर केलेलं नाही.