महाराष्ट्रात राजकीय भूकंप: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री तर अजित पवार उमुख्यमंत्री

रात्रीस खेळ चाले, शिवसेनेचा झाला गेम

मुंबई: कालरात्री पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या नावाला सहमती असल्याचं सांगत असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाने भाजपाशी हातमिळवणी करून रातोरात खेळ करून आज सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली. राजभवनावर राज्यपालांच्या उपस्थितीत हा शपथ ग्रहण कार्यक्रम पार पडला.

शरद पवार यांना समजायला शंभर जन्म घ्यावे लागतील असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी असे वक्तव्य केले होते ते खरे ठरले आहे. सततच्या चर्चांना कंटाळून स्थिर सरकार स्थानेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्या गटानं भाजपच्या सरकारला पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनात शपथविधी झाला. भाजपने सत्तेचा दावा केल्यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आहे. या खेळाने भाजपा आणि राष्ट्रवादी यांनी मिळून शिवसेनेचा गेम केला. राजकारण काय असतं हे शिकवलं आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार, अमित शहा आणि नरेंद मोदी यांच्यात दिल्लीत भेट झाली होती त्या भेटीमागे नेम काय गूढ होत हे स्पष्ट झाले आहे.

Source: ANI