
मुंबई: राजकीय सत्तानाट्यानंतर अखेर महाविकास आघाडीचा शपथविधी समारंभ शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आणि तिन्ही पक्षांच्या एकूण सहा आमदारांनी शपथ ग्रहण केले. मात्र मंत्रिपदाची शपथ घेताना कुणी छत्रपती शिवरायांचे तर कुणी त्यांच्या पक्ष प्रमुखांचे नाव घेतले. अशा पद्धतीने नावे घेऊन शपथ घेणे नियमबाह्य असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. ‘महाविकास आघाडीच्या सरकारने सत्तेत आल्याआल्याच सर्व नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली आहे,’ अशी टिप्पणीही पाटील यांनी केली. खरे पाहता याविरोधात न्यायालयाकडे दाद मागायला हवी, मात्र आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे हा शपथविधी रद्द करण्याची मागणी केली आहे,’ असे पाटील यांनी सांगितले.
भाजपला प्रत्युत्तर देताना महाविकास आघाडीतर्फे नवाब मलिक म्हणाले, ‘जी प्रथा या देशात सुरू झाली आहे, ती प्रथा भारतीय जनता पक्षानेच सुरू केली आहे. भाजपने हा पायंडा रचला आहे. त्यांनी बदलाची सुरुवात स्वत:पासून करावी






