ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाक दुसरी गुलाबी कसोटी: डेव्हिड वॉर्नर याचे त्रिशतक

अडलेड : येथील ओव्हल मैदानावर पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या दिवसरात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरयानं खणखणीत त्रिशतक ठोकलं आहे. पाकविरुद्ध सुरू असलेल्या या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ३ गड्यांच्या मोबदल्यात ५५० धावांचा डोंगर उभारला आहे. त्यात वॉर्नरच्या नाबाद त्रिशतकाचा समावेश आहे. ३८९ चेंडूंमध्ये त्यानं हे त्रिशतक पूर्ण केलं. त्यात ३७ चौकारांचा समावेश आहे. १२० षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून त्यानं दिमाखात हे त्रिशतक साजरं केलं. तो ३३५ धावांवर नाबाद राहिला. ब्रॅडमन आणि नंतर टेलर यांचा विक्रम मोडल्यानंतर ऑस्ट्रेलियानं डाव घोषित केला.

पाकविरुद्ध त्रिशतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.