
नवी दिल्ली: बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या शरणार्थीना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्यासाठी मोदी सरकारने लोकसभा सभागृहांत प्रारीत झाल्यानंतर आज राज्यसभेत 125 विरुद्ध 105 मतांनी मंजूर करण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेपाठोपाठ आज राज्यसभेतही हे विधेयक मांडलं. या विधेयकावर ६ तासाहून अधिक वेळ चर्चा केल्यानंतर रात्री ८ नंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. आधी चिकित्सा समितीकडे विधेयक पाठवण्यासाठी मतदान घेण्यात आलं आणि बहुमताने राज्यसभेने ही मागणी फेटाळून लावली. हे विधेयक समीक्षा समितीकडे पाठवण्याच्या विरोधात 124 मते पडली तर बाजूने 99 मते पडली. शिवसेनेने यावेळी सभात्याग केला. त्यानंतर विधेयकांवरील १४ सूचनांवर मतदान घेण्यात आलं आणि बहुतेक सूचना फेटाळण्यात आल्या.
नंतर विधेयकावर अंतिम मतदान घेण्यात आलं. यावेळी विधेयक मंजूर करण्याच्या बाजूने 125 मते पडली आणि विधेयकाविरोधात 105 मतं पडली.






