
हैदराबाद : २७ नोव्हेंबर रोजी चौघा नराधमांनी डॉक्टर दिशा हिच्यावर अत्याचार करून तिला जाळून मारलं होतं. या प्रकरणी मोहम्मद आरिफ, जे. नवीन, जे. शिवा आणि चेनाकेशवुलू यांना अटक करण्यात आली होती. चौकशीसाठी घटनास्थळावर नेलेल्या या नराधमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्याआधी पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली होती. त्यात त्यांनी अत्यंत धक्कादायक माहिती दिली होती. चौघांपैकी आरिफ आणि चेन्नाकेशवुलू यानी नऊ बलात्कार व हत्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. तेलंगणातील संगारेड्डी, रंगारेड्डी व मेहबूबनगर तसंच, कर्नाटकच्या सीमावर्ती भागांत त्यांनी हे गुन्हे केले होते. त्यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्यांमध्ये वेश्या आणि तृतीयपंथीयांचाही समावेश होता.






