
मुंबई: अनेक भारतीयांना रेसिंग बाईकचं वेड असतं. बाईक पाहताना पहिला प्रश्न असतो बाईक किती सीसीची आहे. भारतीय बाजारात फार तर पाचशे सीसीच्या बाईक्स उपलब्ध आहेत. पण आता ज्यांना वेगाचा थरार अनुभवायचा आहे अशा बाईकप्रेमींसाठी ट्रायम्फची रॉकेट-थ्री नावाची बाईक बाजारात आली आहे. भारतीय बाजारात आता ट्रायम्फ कंपनीची रॉकेट-थ्री नावाची एक सुपरबाईक आली आहे. या बाईकला दोन कारच्या ताकदीएवढं इंजिन लावण्यात आलं आहे. अवघ्या काही सेकंदात ही बाईक वाऱ्याच्या वेगाने सुसाट धावू लागते. ही बाईक गुळगुळीत हायवेवर आणि ओबडधोबड रस्त्यांवरही चालवू शकता. ओबडधोबड रस्त्यांवर चालवण्यासाठी बाईकमध्ये काही स्पेशल फिचर्स देण्यात आले आहेत.











