तरुण अभिनेता कुशल पंजाबी याची आत्महत्या

मुंबई: बॉलिवूड, टीव्ही आणि वेब सीरीजमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारा तरुण अभिनेता कुशल पंजाबी (३७ वर्ष) यानं गुरुवारी आत्महत्या केली. मानसिक त्रासातून त्यानं आत्महत्या केल्याची बाब पुढं आलीय. वांद्र्यातील राहत्या घरीच गळफास घेऊन त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्येपूर्वी त्यानं लिहिलेली सुसाइड नोटदेखील पोलिसांना सापडलीय. कुशलच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर दु:ख व्यक्त करण्यात येतंय.