
नवी दिल्ली: सुमारे १ कोटी जीएसटी नोंदणीधारकांनी दिलेल्या वेळेत जीएसटी परतावे भरलेले नाहीत. नव्या नियमानुसार आता या नोंदणीधारकांना नोटीस बजावण्यात येईल. जे या नोटीशीकडे दुर्लक्ष करतील, त्यांच्या संपत्ती आणि बँक अकाउंटवर टाच आणली जाऊ शकते. अंतिम रिटर्न भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आधी तीन दिवस प्रक्रियेची सुरुवात करण्यास प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांना सांगण्यात आले आहे. दर महिन्याची २० तारीख ही कर परतावा फाईल करण्याची शेवटची तारीख असते. २० तारखेपर्यंत रिटर्न भरले नाहीत, तर सिस्टीम जनरेटेड मेसेज सर्व डिफॉल्टर्सना पाठवला जाणार आहे. त्या व्यतिरिक्त सिस्टीम संबंधित अधिका-यांना याबाबत सूचनाही देणार आहे.
यासंबंधीच्या प्रक्रियेला प्रतिसाद दिला नाही, तर प्राप्तिकर विभाग तुमची मालमत्ता आणि बँक खाते गोठवू शकते. मासिक रिटर्न फाईल न केल्यास, पाच दिवसांनंतर संबंधिताला नोटीस पाठवली जाणार आहे.










