नवी मुंबई स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात तिसऱ्या क्रमांकावर सर्वात स्वच्छ शहर

नवी मुंबई: नवी मुंबई महानरपालिकेच्या मानात अजून एक तुरा रोवला गेला आहे कारण नवी मुंबई शहराचा देशात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेशन मध्ये डिसेबरअखेर देशात तिसऱ्या क्रमांकावर निवड झाली आहे.

देशात इंदूर प्रथम क्रमांकावर तर राजकोट दुसऱ्या क्रमांकावर आहे. नव्या मुंबईने एकूण 2000 गुणापैकी 1515 गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. प्रत्येक सीझन नंतर नवी मुंबई शहराचे रँकिंग सुधारलेले पाहायला मिळते. मागच्या वेळी नवी मुंबई सातव्या क्रमांकावर होते.