
मुंबई: वर्ष 2020 या नवीन वर्षाचे जगभरात आणि देशात जल्लोषात स्वागत करण्यात आले. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, चीन तसेच देशातील अनेक भागात रात्रभर सिलिब्रेशन करून उत्साहाने नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.
न्यूझीलंडमधील ऑकलँड येथे सर्वप्रथम नव्या वर्षाचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे स्वागत सुरू झाले.
वाराणसीत गंगा आरती करत नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रोशणाईने झळाळून निघाले होते. मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती नवीन वर्षात सिधदीविनायक दर्शन घेऊन सुरुवात करण्याची अनेकांची इच्छा असते तसेच शिर्डीतील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. साई मंदिर नवीन वर्षाच्या अनुषंगाने विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. मुंबईत गेट वे ऑफ इंडियाच्या ठिकाणी नववर्षाच्यां स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला ट्वीतर च्यां माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
आमच्या युवा प्रगती मासिकामार्फत सर्व सभासद व वाचक वर्गाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.






