
पुणे: हर्षवर्धन आणि शैलेश यांच्यात रंगलेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर याने बाजी मारली. दोघेही काकांच्या तालमीत असल्याने त्यांना एकमेकांचे डाव माहीत होते. त्यामुळे ही लढत रंगतदार झाली.
हर्षवर्धन सदगीर हा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटात नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीर आणि लातूरचा शैलेश शेळके यांच्यात ही कुस्ती रंगली. ३-२ ने हर्षवर्धन सदगीरने शैलेश शेळकेवर मात केली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि सिटी कार्पोरेशनतर्फे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.











