मुंबई महापालिकेच्या मानखुर्द येथील पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय

मुंबई: मानखुर्द येथील प्रभाक क्रमांक १४१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणारे व विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले विठ्ठल लोकरे यांनी पालिका पोटनिवडणुकीत मात्र पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. विठ्ठल लोकरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे बबलू पांचाळ यांचा १ हजार ३८५ मतांनी पराभव केला. लोकरे यांना ४ हजार ४२७ तर पांचाळ यांना ३ हजार ४२ मते मिळाली. लोकरे यांच्या दणदणीत विजयाने शेवाळे यांचे या भागातील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.