नव्या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आज

मुंबई:

नव्या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण आज पाहायला मिळणार आहे. या चंद्रग्रहणाचा कालावधी तब्बल चार तास असणार आहे. हे चंद्रग्रहण रात्री 10.30 वाजता सुरू होणार आहे. या चंद्रग्रहणाला ग्रहण म्हटलं जाणार नाही हे चंद्रग्रहण छायाकल्प चंद्रग्रहण असणार आहे. यावेळी चंद्राची प्रतिमा धुसर होताना दिसणार आहे. 

हे चंद्रग्रहण रात्री 10 वाजून 37 मिनिटांनी सुरु होईल आणि रात्री 2 वाजून 42 मिनिटांनी संपेल.

या छायाकल्प चंद्रग्रहणाला अमेरिका आणि युरोपकडून ‘वुल्फ एक्लीप्स’ असं नाव देण्यात आलं. 2019 च्या अगदी शेवटच्या महिन्यात संपूर्ण जगाला अद्भुत असं सूर्यग्रहण पाहायला मिळालं. खगोलप्रेमींकरता ही सुवर्णसंधी होती. या सूर्यग्रहणाला ‘रिंग ऑफ फायर’ असं संबोधण्यात आलं. 2020 च्या सुरूवातीलाच चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण झाली.