भाजपाविरोधात राज्यातील सभानंतर राज ठाकरे यांचा मोदी शाह विरोधी दिल्लीत एल्गार

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी नरेंद्र मोदी-अमित शहा यांचा पराभव करण्यासाठी मनसेने राज्यभरात 8 ते 9 ठिकाणी सभा घेवून रान उठवुन दिले. सुत्रांच्या माहिती नूसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता भाजपाविरोधात दिल्ली येथे सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकसभेचे निमित्त साधून विधानसभेची चाचपणी करण्याची तयारी मनसेने केलेली दिसते.

सोलापूर, सातारा, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नवी मुंबई, पनवेल, आदि भागात मनसेकडून स्वतंत्र सभा घेण्यात आल्या. थेट आघाडीच्या व्यासपीठावर उपस्थित न राहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचे नियोजन पक्षाकडून करण्यात आले असे खाजगीमध्ये बोलण्यात येत आहे. गुढी पाडवा मेळाव्यामध्ये अधिकृतरित्या याबाबत घोषणा झाल्या नंतर महाराष्ट्रात अक्षरश: वादळ उठवुन दिले. 19 मार्चच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्येही राज यांनी लोकसभा लढवणार नसल्याचं सांगत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना राजकीय पटलावरुन बाजूला करा, येत्या निवडणुकीत भाजपाला मतदान करु नका असा प्रचार कार्यकर्त्यांनी करावा असं आवाहन केलं होतं.  भाजपा व शिवसेनेला हा अनपेक्षित धक्का होता. आता येणारा काळच ठरवेल या सभांचा मतदारांवर प्रभाव झाला. विधानसभेची तयारी करण्याच्या द्रुष्टीने या सभा राज यांच्यासाठी फार महत्वाच्या ठरणार आहेत. दिल्लीत सभा घेवुन राज यांना राष्ट्रीयराजकारणात एंट्री करण्याची ईच्छा म्हणण्यापेक्षा सतत चर्चेत राहून स्वत: च्या पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न दिसत आहे. 1