विमल फौंडेशन मार्फत भव्य नागरिक सत्कार कार्यक्रमाचे आयोजन; माजी खासदार संजीव नाईक यांची उपस्थिती

नवी मुंबई: जुईनगर प्रभागात विमल फौंडेशन च्या माध्यमातून ( भव्य नागरी सत्कार ) वेलकम T20 हा अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विमल फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश ढसाळ व सेक्रेटरी आकाश ढसाळ यांच्या मातोश्री श्रीमती विमलताई ढसाळ यांच्या एकविसाव्या पुण्यतिथीनिमित्ताने सदर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कष्टकरी समाजाला सन्मानित करून समाजाचे ऋण फेडण्याची अनोखी पण प्रशंसनीय पद्धत संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आले. भाजी विक्रेते महिला, रिक्षा चालक आणि सोसायटी सुरक्षा रक्षक यासर्वांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.खासदार संजीवजी नाईक साहेब यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमांची सुरुवात केली.

सोबतच स्थानिक नगरसेविका तनुजाताई मढवी, माधुरीताई सुतार, शैलेजाताई पाटील, समाजसेवक निशांत भगत, समाजसेवक श्रीधर मढवी, विजय साळे,बाळू जरे, विनोद रटाटे, संतोष अहिर, रुपेश गायकवाड, जयेश मढवी, योगेश मढवी,शैलेश भोईर, द्रोण सर, चंद्रकांत जगताप, सिद्धीताई राणे, तसेच समाजसेवक व प्रगती फौंडेशनचे अध्यक्ष किरण राणे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वरूप खालील प्रमाणे होते.
1) जुईनगर प्रभागातील स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांचा सत्कार
2) जुईनगर प्रभागातील सुरक्षारक्षकांनचा सत्कार
3) जुईनगर प्रभागातील रिक्षा चालकांचा सत्कार
4) घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे निकाल
5) जुईनगर प्रभागातील मानाच्या गणपती मंडळांचा सत्कार
6) सोबतच जेष्ठ नागरिकांसाठी संगीत मैफिल…..

असा आगळा वेगळया कार्यक्रमाचे आयोजन विमल फौंडेशन च्या माध्यमातून करण्यात आले होते. समाजाला एक चांगला संदेश देण्याचे काम विमल फौंडेशन मार्फत होत आहे असे माजी खासदार संजीव नाईक यांनी उदघाटन भाषणात नमूद केले. समाजसेवा व्हायला प्रत्येकाला नगरसेवक, आमदार किंवा खासदार व्हायला हवे असे नाही प्रामाणिक इच्छा असल्यास तुमच्या आमच्या पैकी कोणीही समाजसेवा करू शकतो याबाबत त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक श्री बाबा आमटे तसेच प्रकाश आमटे यांचे उदाहरण दिले. तसेच प्रकाश व आकाश या ढसाळ बंधूंची त्यांच्या समाजकार्याबद्दल मुक्तांठाने प्रशंसा केली.

कार्यक्रमात मराठी हिंदी गाण्याची सुरेल मैफिल व धडाकेबाज लावण्या आयोजित करण्यात आल्या होत्या. साई लीला पालखीतील साईभक्त उमा बुवा यांनी अतिशय सुंदर गाणी गाऊन सर्वाना मंत्रमुगन्ध केले. गणेश देसले यांनी आपल्या मिमिक्री मधून लोकांना खूपच हसवले. ह्रिदम डान्स अकॅडमी मधील मुलांनी अतिशय सुंदर डान्स सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. आंबेडकर चळवळ जोमाने पुढे नेणाऱ्या आद.चंद्रकांत जगताप साहेब आणि आद.सिद्धार्थ साळवी साहेबाना विमल फॉउंडेशन च्या माध्यमातून गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले..

परिसरातील महिला व जेष्ठ नागरिकांनी सारा परिसर फुलून गेला होतो. नागरिकांना चहा आणि अल्पोउपाहार ची सोय करण्यात आली होती.

विमल फौंडेशन च्या सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेऊन या कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी खूपच मेहनत घेतली, उपाध्यक्ष -अब्दुल गफूर, सचिव -अभिमन्यू गुप्ता,खजिनदार -आकाश ढसाळ,महासचिव -शैलेश दुदळे, प्रमुख सल्लागार -किरण राणे सर, कायदेशीर तज्ज्ञ -जब्बार पठाण सर, सभासद -वंदना ढसाळ, विकास ढसाळ, राकेश शिंदे, बाळू जरे, राजेश तुपलोंढे,विजय सोनावणे आणि त्यांची टीम, या सर्वांचे विमल फॉउंडेशन चे अध्यक्ष प्रकाश भाऊ ढसाळ यांनी मनापासून आभार मानले व अशीच साथ यापुढेही अशीच मिळत राहील अशी आशा व्यक्त केली.