
नवी दिल्ली: नरेंद्र मोदींनी सोमवारी (२० जानेवारी) दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपण अपयशी झालो तरी यशाचं शिक्षण घेऊ शकतो. जर अपयशी झालात तर याचा अर्थ तुम्ही यशाकडे आगेकूच केली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी पराभवाला विजयामध्ये बदलवलं होतं. तर अनिल कुंबळे गंभीर दुखापत झालेली असतानाही खेळला, असं मोदी म्हणाले.
मोदींनी सगळ्यात पहिले २००१ साली कोलकात्यात झालेल्या ऐतिहासिक मॅचचा दाखला दिला.२००१ साली भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कोलकात्यात टेस्ट मॅच सुरु होती. मॅचमध्ये भारताची परिस्थिती खराब होती. लक्ष्मण आणि द्रविडने त्यादिवशी कमाल केली. दोघंही दोन दिवस खेळले आणि परिस्थिती बदलून टाकली. एवढच नाही भारताने ती मॅचही जिंकली.’
पंतप्रधानांनी दुसरं उदाहरण २००२ सालच्या मॅचचं दिलं. ‘२००२ सालीही अशीच एक मॅच झाली. तेव्हा भारतीय टीम वेस्ट इंडिजमध्ये खेळायला गेली होती. अनिल कुंबळेच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली. एवढ्या गंभीर दुखापतीमध्येही कुंबळेने बॉलिंग केली.
दोन्ही मॅचवेळी निराशेचं वातावरण होतं. पण त्यांनी संकल्प केला एकत्र येऊ पण हारणार नाही. या संकल्पाचा सकारात्मक परिणाम झाला. एका व्यक्तीचा संकल्प इतरांसाठीही प्रेरणादायी ठरतो, अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली.






