27 जानेवारीपासून मुंबई 24×7

मुंबई: आदित्य ठाकरे यांचे नाईट लाईफचे स्वप्न पूर्ण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून 27 जानेवारीपासून अंमलबजावणी होणार आहे. अशी माहिती राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मंत्रीमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे बोलत होते. नाईट लाईफ सुरु होत असली तर मुंबई पोलिसांवरील ताण वाढणार नाही, असा दावाही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे मुंबई आता 24×7 जागी राहणार आहे.