
पुणे: : अल्पावधीतच लोकप्रिय झालेला येवले चहा अडचणीत आला आहे. अन्न व औषध प्रशासन यांनी पुण्यातील येवले चहाचा नमुना तपासला असता त्यात भेसळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालानुसार येवले चहात रंग असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवालानुसार चहात रंग टाकत असल्याचे उघड झाले आहे. FSSAI च्या गाईडलाईन नुसार रंगाचा वापर करणे चुकीचे आहे.
पुणेयेथील कोंडाव्यामधील येवले चहाचे उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. येवले चहा प्यायल्याने पित्त होत नाही तसेच चहा बनविण्यासाठी मिनरल वॉटर पाण्याचा वापर केला जातो, तसेच पॅक बंद उत्पादनावर माहिती न छापणे आदी गोष्टींमुळे येवले चहाच्या उत्पादन प्रक्रियेवर बंदी घालण्यात आली होती.
येवले चहात मेलमाईन चा वापर केला जात असल्याचे बोलले जात होते म्हणून अन्न व औषध प्रशासन मार्फत कोंढाव्यातील येवले चहाच्या फूड प्रॉडक्ट चे नमुने तपासण्यासाठी घेतले होते. काल FDA च्या अहवालानुसार रंग वापरत असल्याचे स्पष्ट झाले.






