सावधान: मुंबईत आढळले कोरोना व्हायरसचे दोन संशयित रुग्ण

मुंबई: चीनमध्ये सध्या कोरोना वायरसने थैमान घातले आहे. मुंबईमध्ये कोरोना वायरसचे दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. दोघांना कस्तूरबा हॉस्पीटलच्या स्पेशल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. हे दोघे चीनहून परतले होते. ‘कोरोना वायरस’च्या विळख्यातून वाचण्यासाठी सरकारने महत्वाची पावले उचलली आहेत. कस्तूरबा हॉस्पिटलमध्ये यासाठी स्पेशल वॉर्ड ठेवण्यात आला आहे.

चीनमध्ये पसरलेल्या कोरोना (corona virus)  व्हायरसचं सावट सध्या संपूर्ण जगावर आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता या राज्यांच्या विमानतळांवर देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी देखील विमानतळांवर करण्यात येत आहे. 

हे दोघे चीनहून परतले होते. ‘कोरोना वायरस’च्या विळख्यातून वाचण्यासाठी सरकारने महत्वाची पावले उचलली आहेत. कस्तूरबा हॉस्पिटलमध्ये यासाठी स्पेशल वॉर्ड ठेवण्यात आला आहे. हा वॉर्ड इतर वॉर्डपेक्षा वेगळा ठेवण्यात आला आहे.