
नवी मुंबई : नवी मुंबईतील नामवंत संस्था प्रगती फौंडेशन आणि विमल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 71व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर आयोजित केले होते. भारताचा प्रजासत्ताक दिन आणि विमल फौंडेशनचे संस्थापक प्रकाश भाऊ ढसाळ व आकाश भाऊ ढसाळ या बंधूचा वाढदिवस हा देखील याच दिवशी असतो.

दरवर्षी प्रजासत्ताक दिनी प्रगती फौंडेशन व विमल फौंडेशन नव्या मुंबईतील लोकांना आरोग्य सेवा त्यांचा दारात मिळाव्यात म्हणून हा उपक्रम राबवित असतात. आजच्या या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे या शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणी ते ईसीजी पर्यंत सर्व सेवा मोफत उपलब्ध करण्यात आली होती. यामध्ये सर्वसाधारण शरीर तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी, दंत चिकित्सा, नेत्र चिकित्सा, हृदय रोग तपासणी, प्रोफाइल तपासणी, चष्मा नंबर, मोतीबिंदू तपासणी, आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर सल्ला व औषधे वाटप, चष्मा वाटप इत्यादी सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर आवश्यक असल्यास येणाऱ्या शिबिरार्थीचे ईसीजी तपासणी करण्यात येत होती.याशिवाय मोफत औषधे वाटप करण्यात आले. शिबिरात चष्मायाचे नंबर असणाऱ्या लाभार्थीला मोफत चष्मा उपलब्ध करुन देण्यात येत होते.

त्याच प्रमाणे जेष्ठ नागरिकाना सोबत समाजातील सर्वच वयोगटातील लोकांना मोफत आरोग्यविषयक उपचार आणि चष्मा वाटप सुध्दा करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर आद.जयवंतजी सुतार साहेब उपस्थित होते, त्यांनी आरोग्यशिबिराची संपूर्ण माहिती घेतली, व जनतेशी सुसंवाद साधला आणि कार्यकरत्याना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेविका सौ.तनुजाताई मढवी, सौ.माधुरीताई सुतार, ब प्रभाग समिती सदस्य मा.विजय साळे, सोबतच मनसे महिला उपशहर अध्यक्ष सौ.अनिथा नायडू, उपविभाग अध्यक्षा विद्या इनामदार उपस्थित होत्या. मिलेनियम हॉस्पिटलचे संचालक डॉ वेंकेटेश हांचाटे व डॉ हांचाटे मॅडम यांनीही उपस्थित राहून शिबिरात सेवा उपलब्ध करून दिली.

या कार्यक्रमाला बौध्दजन पंचायत समीतीचे सदस्य आद.सिध्दार्थजी साळवी व त्यांचे सहकारी सुधा उपस्थित होते. जुईनगर मधील जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील सर्वच नागरिकांनी उपस्थित राहून आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. समाजसेवक श्री.शैलेशजी भोईर व अनंत पाटील (अण्णा पाटील), राकेश वाणी, चिन्मय चव्हाण, मनोहर शिंगाडे, साहिल अरोरा, किशोर म्हात्रे, माधुरिताई सुतार, नगरसेवक गणेश म्हात्रे, श्रीधर मढवी, हनुमान पाटील आणि रुपेश गायकवाड , बाळू झरे, संतोष अहिरे यानी सुद्धा उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

आय टी एम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या विद्यार्थ्यानी सदर शिबिरात आरोग्य सेवकांची जबाबदारी चोखपणे पार पाडली.
या कार्यक्रमाचे आयोजक विमल फौंडेशन चे अध्यक्ष मा.प्रकाश ( भाऊ )ढसाळ , आकाश भाऊ ढसाळ आणि प्रगती फौंडेशन चे अध्यक्ष मा.किरण राणे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे व डॉक्टर वर्गाचे आभार मानले.

शिबिरासाठी प्रगती व विमल फौंडेशन व्यतिरिक्त इतर संस्थानीही सहकार्य केले. यात मिलेनियम हॉस्पिटल, डॉ डी वाय पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल, के बी एच बी बचू अली आय हॉस्पिटल , सद्गुरु ब्लड बँकव थायरो केअर , युवा प्रगती आणि आय टी एम या संस्थाचा सहकार्य लाभले.

शिबिरात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने “एक थेंब देशासाठी” यासंकल्पनेवर आधारित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास 60हून अधिक लोकांनी रक्तदान केले. आयोजक किरण राणे व प्रकाश ढसाळ यांनी स्वतः रक्तदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला.
जवळपास 300हून अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.






