कांगारूंच्या देशात: डॉ भास्कर धाटावकर यांच्या लेखणीतून सफर ऑस्ट्रेलियाची – भाग 8

आजची सकाळ फारच प्रसन्न वाटत होती. हवेत चांगलाच गारवा होता. सर्वजण हाॅटेलच्या ब्रेकफास्ट कक्षेमध्ये जमले होते. आता एकमेकांच्या चांगल्या ओळखी झाल्या होत्या. आपसात पोस्टल अ‍ॅड्रेस, मोबाईल फोनची देवाणघेवाण दोन्हीकडून सुरूच होती.

पुढील ट्रीपचे कळवा आम्ही नक्कीच सहभागी होणार असे आश्वासन दिले जात होते. माहोल अगदीच अनोखा झाला होता याचे कारण म्हणजे आमच्या कागांरूच्या देशातील धावत्या भेटीतील शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिले होते. ग्रुप मधल्या सर्वाची चांगलीच जानपहचान झाली होती.

ऑस्ट्रेलियात येऊन किक्रेटवर काहीच बोलणे झाले नाहीतर तो किक्रेटचा उपमर्द झाला असता आणि आज किक्रेट पुराण कधी, कोणी सुरु केले हे समजले नाही पण त्यामध्ये किक्रेट रसिक या गप्पात सहभागी झाले होते. प्रत्येकजण आपल्या स्मरणशक्तीचे पोतडे उघडून एकेक चीज सुनावत होते. सुरुवातीलाच अहमदाबादचा वर्ल्ड कप हरल्याबद्दल सामुदायिक उसासे टाकून त्याची का हरलो याबाबतचे पोस्टमार्टेम झटपट करून झाल्यावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील किक्रेट संबधावर चर्चा सुरू झाली.

भारत आणि ऑस्ट्रेलियाचे चांगलेच संबंध प्रस्थापित झालेले आहेत. दोन्ही देश लोकशाही आणि बहुलवादाच्या समान तत्वाने जोडले गेले आहेत तसेच हे देश ब्रिटिश साम्राज्याच्या जोखडातून स्वतंत्र झाले आहेत. सध्या काॅमनवेल्थचे सदस्य आहेत. साहाजिकच या दोन्ही देशांत स्वातंत्र्य पूर्वीपासून किक्रेटचे संबंध प्रस्थापित झाले असून त्याचा इतिहास फारच मनोरंजक आहे. भारतात किक्रेटला तर धर्माचे स्थान प्राप्त झाले आहे.प्रत्येक मुलगा आणि मुलगी किक्रेटर होण्याची स्वप्ने पाहात असतात.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील किक्रेट सामने अतिशय चुरसीने खेळले जातात. भारतातील सुप्रसिद्ध फिरकी गोलंदाज रूसी सुरती तर ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूना फिरकी गोलंदाजीचे धडे दिले आहेत

सर डोनाल्ड ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकर हे दोन्ही देशांत आख्यायिका बनून राहिले आहेत. शेन वॉर्न हा फिरकी गोलंदाजीचा जादूगार तर लिली ,मॅकेन्जी सारखे अनेक तेजतरार गोलंदाज याचा आदर्श तर भारतात आजच्या पिढीला राहुल द्रविड, सेहवाग, व्ही.लक्ष्मण सारखे फलंदाज आर्दश यांच्याविषयी विशेष आदराची भावना व्यक्त केली जात असते. या दोन्ही संघातील सामन्यास हमखास गर्दी होत असते. भारतात दरवर्षो आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित आय. पी. एल. स्पर्धेत ऑस्ट्रेलियन नामांकित खेळाडूचा लक्षणीय सहभाग असतो. कित्येक दोन्हीकडील खेळाडूचे वैयक्तिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आणि दिवसागणिक ते वृध्दीगंत होत आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही देशांत किक्रेट बाबत एक अनोखे नाते अनेक वर्षांपासून जोडले गेले आहे आणि त्यातूनच भारताचा महान फलंदाज विक्रमवीर सुनील गावस्कर आणि ऑस्टेलियाचा प्रख्यात कर्णधार बाॅर्डर यांच्या संयुक्त नावे ट्राफी खेळविली जात आहे. या किक्रेट जगातील हे दोन्ही देश किक्रेट विश्वात मानाचे स्थान राखून आहेत.

आज आम्ही प्रथम सिडनीतील most exciting location Darling Harbour, heart of Sydney and Aquarium, Zoo, या ठिकाणी भेट देऊन तेथील प्राणी जगताचे निरीक्षण केले.ज्या ऑस्ट्रेलियाची ओळख कांगारूचा देश असा करतात ज्याला राष्ट्रीय प्राणी असा मान मिळाला आहे कागांरू म्हणजे नेहमी पुढे जाणारा त्याला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा आहे.कांगारू आता सन्मानाचे प्रतिक आहे ऑस्ट्रेलियाची आन बाण शान आहे.

अशा या पोटात बाळ ठेवून दुडू दूडू इकडून तिकडे धावणारा कागांरू जवळून पाहाताना खूपच मजा आली. बालपणाची याद आली.आज प्राणी संग्रहालयातील कोणताही तेथील कांगारू मला हवी तशी पोझ देण्यास त्यांचा काहीच मूड नव्हता मी त्यांना म्हटलेही तुमचा फोटो मुखपृष्ठावर छापून प्रसिद्ध करीन!माझी सुचना नाकारत दूरवर जाऊन बसला नतंर लक्षात आले मराठीत सांगून कसे कसे समजले असणार?!

ऑस्ट्रेलियातील सुरुवातीच्या काळातील जंगली प्राण्याचे हल्ले त्याला दिलेली काऊंटर प्रतिक्रिया तसेच त्यांची जीवन प्रणाली याबाबतची एक छान प्रदर्शनी पहायला मिळाली. सिडनी ऑपेरा हाऊस, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट, सिडनी हार्बर ब्रिज, स्कायलाईन आणि अखेर सिडनी हार्बर क्रूझवरून पहाताना मला शिकागोतील क्रूझ मधून केलेली सैर आठवली. या क्रूझवरून आम्ही भरपूर फोटोग्राफीचा आनंद घेतला.

यानंतर आम्ही लगेचच सिडनीतील सर्वाधिक उत्तुंग सिडनी टाॅवर पाहाण्यासाठी गेलो. हा 309 फूट उंचीचा आहे. येथे प्रचंड गर्दीच होती. आमची तिकीटे बुक होतीच.

दुपारी तीन वाजताचे टायमिंग दिले होते.टिम मॅनेजर वेळेवर पोचण्याच्या चिंतेत होता.अत्यंत कडक सिक्युरिटी तपासणी झाल्यानंतर आम्हांस वर लिप्टनी सोडण्यात आल्यानंतर सिडनी शहराचे विहंगम दर्शन झाले. सिडनी शहराचा नजारा आम्ही मोबाईल कॅमेर्‍यातून बंदिस्त करीत होतो.

सिडनी शहर हे जगातील काही प्रमुख शहरापैकी एक महागडे शहर आहे. येथे शैक्षणिक, सांस्कृतिक बाबीना अनुकूल असे पोषक वातावरण आहे. येथील किक्रेट मैदानही सुप्रसिद्ध आहे.

आजची साईटसिंईग संपली होती. आम्हांस हाॅटेलवर सोडण्यात आले. काहीजण शाॅपिंगसाठी काही आपल्या नातेवाईकांना भेटण्यास गेले. पुन्हा सांयकाळी साडेसातला डिनरसाठी भारतीय रेस्टॉरंट मध्ये जाण्यासाठी आम्ही बसमध्ये बसत होतो. अजूनही साईटसिंईगचा कार्यक्रम शिल्लक होताच.