
विशाखापट्टणम: इलेमीनेटर राऊंड मध्ये संधी मिळालेल्या दिल्ली कॅपिटल चा दणदणीत पराभव करून धोनीची चेन्नई सुपर किंग रोहितच्या मुंबई इंडियन विरुद्ध भिडण्यास तयार झाली आहे. काल झालेल्या दिल्ली कॅपिटल विरुध्द चेन्नई सुपर किंग सामन्यात चेन्नईने सहा विकेट राखून दिल्लीवर आरामात विजय संपादन केला. श्रेयस अय्यर च्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल ने संपूर्ण आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लक्षणीय कामगिरी बजावली होती. तरुण तडफदार कप्तान श्रेयस अय्यर याने आपल्या नेतृत्वाची छाप पाडली. पण फायनालच तिकीट मात्र हुकलं.
काल सुरुवातीपासून दिल्लीच्या फलंदाजांनी कच खाल्ली. केवळ ऋषभ पंत बऱ्यापैकी खेळला. त्याने 25 चेंडूत 38 धावा ठोकल्या परंतू धुरंदर धोनीच्या नेतृत्वापुढे दिल्ली कमी पडली आणि आयपीएल च्या इतिहासात प्रथमच दिल्ली ला फायनलमध्ये धडक मारण्याची संधी मिळाली होती ती गेली. दिल्लीने 20 षटकात 9 बाद 147 अशी धावसंख्या रचली , चेन्नईने सहज दिलेले लक्ष शेन वॉटसन आणि फ्लेप डू प्लेसीसीसच्या अर्धशतकाच्या जोरावर गाठले आणि फायनलमध्ये धडक दिली. चेन्नईचा हा आयपीएल मधील शंभरावा विजय ठरला. रविवारी चेन्नई आणि मुंबई यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे.











