लासलगाव येथे हिंगणघाट पुनरावृत्ती, पीडितेला उपचारासाठी मुंबईला हलविले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली पिडीतीची भेट

नाशिक/ मुंबई: महाराष्ट्र राज्यात एकामागून एक महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल परत एकदा हिंगणघाट घटनेची नाशिक येथे पुनरावृत्ती झाली आहे. जवळपास पाच ते सहा जणांनी मिळून एका महिलेला नाशिक येथील लासलगाव बस स्थानकाजवळ जिवंत पेटवून दिले अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

नाशिकच्या लासलगाव परिसरात हिंगणघाटची पूनरावृत्ती झाल्यामुळे खळबळ माजली आहे. त्यामुळे या नराधमांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. अशा सततच्या घटनेवरून महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं दिसून येत आहे.

येथील लासलगाव एसटी बसस्थानकावर (Lasalgaon ST bus station) महिलेच्या अंगावर पेट्रोल (Petrol) ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत महिला ६७ टक्के भाजली असून तिला अधिक उपचारासाठी नाशिक (Nashik hospital) येथे हलविण्यात आले आहे. 

६७ टक्के भाजल्यानं पीडित महिलेची प्रकृती गंभीर आहे. सध्या तिला अधिक उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आलं आहे. मसीना रुग्णालयात पीडित महिलेवर पुढील उपचार होणार आहे. पहाटे तिची तब्येत अचानक खालवली त्यामुळे तिला तात्काळ मुंबईत हलवण्यात आलं. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांनी पीडितेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. दरम्यान, पीडित महिलेच्या (victim) जबाब घेतला असून त्यानुसार तिघांपैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी अजून मिळालेला नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी दिली.