
नवी दिल्ली:
निर्भयाच्या दोषींना 3 मार्चला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे. निर्भया गँगरेप प्रकरणातील आरोपींविरोधात पटियाला हाऊस कोर्टाने सोमवारी जवळपास एक तास चाललेल्या सुनावणी नंतर फाशीची शिक्षा सुनावली आहे. निर्भयाच्या दोषींना आतातरी फाशी होईल का अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली आहे. दोषींच्या वकिलांनी अजून काही पर्याय उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे.
सरकारी वकिलांनी म्हटलं की, ‘अक्षय, विनय आणि मुकेश यांची दया याचिका फेटाळली गेली आहे. पण पवनकडून अजून दया याचिका आणि क्यूरेटिव पिटिशन दाखल होणं बाकी आहे. हायकोर्टाने दिलेला एक आठवड्याची वेळ 11 फेब्रवारीला संपली आहे. या प्रकरणातील दोषींवर इतर कोणत्याही कोर्टात कोणतीही याचिका प्रलंबित नाही. त्यामुळे नव्याने डेथ वॉरंट काढलं जावू शकतं.’
याआधी 2 वेळा निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी डेथ वॉरंट जारी झाले आहेत.






