राज्यात अवकाळी पाऊस: विधानसभेत पडसाद

मुंबई : राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याचा परिणाम विधानसभेतही पाहायला मिळाला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी केलीय. तर, ऑक्टबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचे पैसे दिले नाही. आता हे सरकार काय देणार? असा प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना घेरण्याच प्रयत्न केला.

रविवारी सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळं ज्वारीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर नाशिकच्या नांदगावमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात गारपीठही झालीय. त्यामुळं उघड्यावर असलेला कांदा भिजल्यानं शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. तर, आज सकाळी पुन्हा लातूर, परभणीत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याचं पडसाद आज विधानसभेत पाहायला मिळाले.