एमटीएनेल आणि बीएसएनएल बंद करण्याचा प्रस्ताव

नवी दिल्ली: बीएसएनएल व एमटीएनएल या दूरसंचार कंपन्या बंद कराव्यात असा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सरकारसमोर मांडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही कंपन्यांना आर्थिक उभारी देण्यासाठी केंद्र सरकारकडून ७४ हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र ही कल्पना आता मागे पडली असून या कंपन्या पूर्णपणे बंद करून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना अन्य सरकारी विभागात सामावून घेणे व अन्य कर्मचाऱ्यांना व्हीआरएस (स्वेच्छानिवृत्ती) देणे या पर्यायाची सरकार चाचपणी करत आहे.