
नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीचा महोत्सव आता अंतिम टप्प्यात पोहचला असून आता प्रतीक्षा लागली आहे ती निकालाची. मोदी सरकार परत एकदा सत्ता स्थापन करणार का कॉंग्रेसला संधी मिळणार ?
लोकसभेच्या अंतिम चारणाचे मतदान काल विविध नऊ राज्यात पार पडले. संध्याकाळ पर्यन्त जवळपास 64 टक्के मतदान झाले. बंगाल वगळता सगळ्या राज्यात मतदान शांततेत पार पडले. बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटना घडल्या आणि पुन्हा एकदा अंतिम टप्प्यात पार पाडलेल्या मतदान प्रक्रियेला हिंसाचाराचे गालबोट लागले. एकूण 59 जागांसाठी नऊ राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले आता वेध लागले आहेत ते तेवीस तारखेच्या निकालाची.
लोकसभा निवडणूकींचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. 542 मतदार संघातील उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. 23 मे रोजी होणार्या मतमोजणींनंतर कोणाचं सरकार येईल हे स्पष्ट होईलच. परंतु मतदान संपताच विविध संस्थाचे सर्वे जाहीर करण्यात आले आणि जवळपास सर्वच एक्जिट पोल जनमत चाचणीतून मोदी सरकार परत एकदा सत्तेवर आरुढ होईल असेच चित्र दिसत आहे.
मोदी सरकार जरी सरकार स्थापन करत असणार अस एक्जिट पोल दर्शवित असला तरी 2014 प्रमाणे स्पष्ट बहुमत मिळेल अशी खात्री देता येणार नाही. सर्व वाहिन्या आणि संस्था यांची जर का सरासरी काढली तर असे लक्षात येते की भाजप प्रणीत एन डी ए ला 291 तर कॉंग्रेस प्रणीत यू पी ए ला 125 आणि इतर पक्षांना 124 जागा मिळतील. महाराष्ट्रात युतीला बर्यापैकी यश मिळेल परंतु गेल्या निवडणुकीपेक्षा 5 ते 6 जागा कमी होतील. थोडक्यात काय तर सर्व संस्थाच्या जनमत चाचणीची सरासरी काढली तर भाजप बहुमत सिद्ध करून सत्ता स्थापनेचा दावा करेल असेच स्पष्ट होत आहे.






