भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन डे मालिका कोरोनामुळे रद्द

मुंबई : देशभरात कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिकेची वनडे सीरिज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिल्याची बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. १५ तारखेला लखनऊ आणि १८ तारखेला कोलकात्यामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये उरलेल्या दोन वनडे मॅच होणार होत्या. धर्मशाळामधली सीरिजची पहिली वनडे पावसामुळे रद्द झाली होती.