T20 महिला वर्ल्ड कप: भारतीय महिला संघाची अंतिम फेरीत धडक

सिडनी : ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत आज भारतीय महिलांचा सामना इंग्लंडशी होणार आहे. सिडनीत होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरु होईल. ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या क्रमवारीत नंबर वन ठरलेली शेफाली वर्मा आणि इंग्लंडची सोफी एकलस्टन यांच्यातलं द्वंद्वं हे या सामन्याचं मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे. टीम इंडिया साखळी सामन्यांमध्ये चार सामने जिंकून 8 गुणांसह अव्वल स्थानी आहे.

इंग्लंडची ही कामगिरी लक्षात घेता शेफाली वर्मासमोरचं आव्हान खूपच मोठं आहे. तिला स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिक्सची साथ मिळाल्याशिवाय बलाढ्य इंग्लंडला हरवणं कठीण आहे. त्यात या लढाई इंग्लंडच्या सोफी एकलस्टनला खेळण्याचं आव्हान भारतीय फलंदाजांसमोर आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमधल्या गोलंदाजांच्या क्रमवारीत सोफी एकलस्टन नंबर वन झाली आहे.