इटलीत एका दिवसात 475 जणांचा बळी

रोम: करोनाच्या संसर्गामुळे इटलीतील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. इटलीत करोनाच्या संसर्गामुळे मृतांच्या संख्येत वाढ आहे. एकाच दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद बुधवारी करण्यात आली. बुधवारी इटलीत एकाच दिवसात ४७५ जणांचा मृत्यू झाला.

चीननंतर इटलीमध्ये करोनाने कहर केला आहे. बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार इटलीमध्ये मृतांची संख्या वाढून २९७८ इतकी झाली आहे. तर, ३५ हजार ७१३ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये २२५७ जणांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत इटलीमधील ४२०५ जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. चीनमध्ये करोनाच्या संसर्गामुळे ३२३७ जणांचा मृत्यू झाला आहे.