लोकसभेच्या निकालावर सट्टा बाजार तेजीत

मुंबई : लोकसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर आत्ता वेध लागले आहेत ते निवडणूक निकालांचा. एक्सिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजारात उसळी निर्माण झाली तसेच सट्टा बाजारातही तेजी पाहायला मिळाली. खात्रीपूर्वक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 12हजार कोटींचा सट्टा निवडणूक निकालावर लागल्याचे समजते. सट्टा बाजारानुसारही भाजपाप्रणित एनडीए ला पसंती अधिक दिल्याचे समजते. सट्टा बाजाराच्या सूत्रानुसार भाजपाला 240 ते 250 जागा तर काँग्रेसला 70 ते 80 जागा मिळतील.