
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐश्वर्या राय बच्चनचा सलमान खान, तसेच स्वतः बरोबरचा आणि अभिषेक बच्चन बरोबरचा अपमानास्पद फोटो ट्विट करून समाजाच्या सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर आणि राज्य महिला आयोगाने नोटीस बाजावल्यानतर विवेक ओबेरॉय याने माफी मागितली आहे. तसेच ट्विटर वरचा ऐश्वर्या राय बद्द्लचे फोटो ही काढून टाकले आहेत. “मी गेल्या दहा वर्षांपासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या आणि महिलांच्या सक्षमीकरण करण्यासाठी कार्य करीत आहे. आतापर्यंत जवळपास दोन हजारांहून अधिक मागासवर्गीय मुलीचं सक्षमीकरण केलं आहे. मी कोणत्याही महिलेचा अनादर करण्याविषयी विचार देखील करू शकत नाही.” असे विवेकने म्हटले आहे. विवेकचा त्याचा आगामी सिनेमा पी एम नरेंद्र मोदीच्या यशासाठी केलेला प्रसिद्धी स्टंटही असू शकतो. परंतु विवेकच्या याकृत्याने त्याची समाजाच्या सर्व स्तरातून टीका झाली.






