मुंबई लोकल पूर्णपणे बंद, देशभरातील रेल्वे वाहतूकही 31मार्चपर्यंत बंद

मुंबई : मुंबईतील लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 31 मार्चपर्यंत लोकल वाहतूक बंद राहणार आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर देशभरातील रेल्वेतील गर्दी लक्षात घेत रेल्वे मंत्रालयानेही रेल्वेसेवा मध्यरात्रीपासून बंद करण्याची घोषणा आहे. 31 मार्चपर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचा रेल्वेचा निर्णय. सर्व मेल, एक्स्प्रेस, इंटरसिटी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारला विश्वासात घेत हा निर्णय घेतला असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. लोकल ट्रेन बंद झाल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यासाठी बसची सोय करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.



तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. 31 मार्चपर्यंत सर्व प्रवासी रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या दरम्यान मालगाड्या सुरू राहणार असल्याची माहिती आहे. याआधीच पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे तसेच कोकण रेल्वेने अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.