
घरगुती हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीचा आरोप असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांच्या अटकेसाठी त्यांच्या पत्नीने मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे.
शनिवारी सकाळी संजीवने काळे राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर दाखल झाल्या. संजीवनी काळे यांच्यासोबत त्यांचे वडीलही आले आहेत. गजानन काळे यांनी केलेल्या अत्याचाराविरोधात त्या राज ठाकरे यांच्याकडे दाद मागण्यासाठी याठिकाणी आल्या आहेत. परंतु, राज ठाकरे हे सध्या पुण्यात आहेत. त्यामुळे संजीवनी काळे आपले गाऱ्हाणे कोणासमोर मांडणार, हे पाहावे लागेल. तसेच या सगळ्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून गजानन काळेंवर कारवाई केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






