
पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉक डाऊन
नवी दिल्ली: दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चाललीय. मंगळवारपर्यंत या संख्येनं ५०० चा आकडा ओलांडलाय तर १० जणांचा ‘कोविड १९’नं बळी घेतलाय. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित केेलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे
- आपल्याला काहीही झालं तरी घरातून बाहेर पडायचं नाही… सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं आहे.
- आज रात्री १२.०० वाजल्यापासून संपूर्ण देशात संपूर्ण लॉकडाऊनची पंतप्रधानांची घोषणा. पुढचे २१ दिवस घरातून बाहेर पडण्याचं विसरून जा… घरात राहा… आज रात्री १२.०० वाजल्यापासून घरातून बाहेर पडणं पूर्णत: बंद होणार.
- आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, करोना व्हायरसचं जाळं तोडण्यासाठी २१ दिवसांचा काळ महत्त्वाचा आहे.
- २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले जनतेचे आभार.
- करोनाचा प्रसार अत्यंत वेगानं होतंय… या रोगाला हरवण्यासाठी विलगीकरण हा एकच उपाय आहे.
- देशाला वाचवण्यासाठी, देशातील प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकावर घरातून बाहेर पडण्याची बंदी लावली जात आहे.
- घरात राहून त्या लोकांबद्दल विचार करा जे सध्या आपला जीव धोक्यात घालून एक एक जीव वाचवण्यासाठी दिवस-रात्र रुग्णालयात काम करत आहेत.
- कोणत्याही प्रकारच्या अफवांपासून दूर राहा! सरकारनं केलेल्या सूचनांचं पालन करणं गरजेचं.
- सरकार सर्व प्रकारची तयारी करीत आहे परंतु तुमचं सहकार्य अपेक्षित. कोरोना साठी पंधरा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर.
- जान हैं, तो जहाँ है… धैर्य आणि अनुशासनाची हीच वेळ… देशात लॉकडाऊनची स्थिती असेपर्यंत आपला संकल्प पूर्ण करायचा आहे. आता केवळ आरोग्याला प्राधान्य.







