लोकसभा 2019 मध्ये मोदी त्सुनामी भाजपा 352, काँग्रेस 52 : फकिराच्या झोळीत भरभरून दिल्याबद्दल तमाम भारतीयांचे धन्यवाद – नरेंद्र मोदी

मुंबई : लोकसभा 2019 च्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि जवळपास निश्चित झाले की पुन्हा नरेंद्र मोदी यांचेच सरकार स्थापन होणार. यंदाची निवडणूक चुरशीची होईल असे वाटत असतानाच पुन्हा एकदा मोदी त्सुनामी मध्ये सर्व विरोधी पक्षांचं पानिपत झालं. 2014 पेक्षा जास्त जागा जिंकून भाजपाने सिद्ध केले की, देशात दुसरा कोणताही पक्ष त्यांच्या इतका मजबूत नाही.

भाजपाने एक हाती 303 जागा मिळवल्या एवढंच काय तर पश्चिम बंगाल मध्ये ही दीदी च्या नाकीनऊ आणले तेथे 18 ठिकाणी कमळ फुलले. भाजपाप्रणित एन डी ए ने 352 जागा जिंकून सर्वांना धोबीपछाड केलं. काँग्रेस ची अवस्था फारच दयनीय झालेली पाहायला मिळाली. एकूण अकरा राज्यात काँग्रेसला भोपळा देखील फोडता आलेला नाही.

महाराष्ट्रात युतीची घोडदौड कायम राहिली. 48 पैकी 42 जागांवर विजय संपादन करून युतीने आपली ताकत दाखवली. उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा यशस्वीपणे आपले नेतृत्व सिद्ध केले तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची कमान आणखी उंचावली. विजयी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी “चला लावा रे ते फटाके” म्हणत राज यांना टोला हाणला. राज यांनी जेथे जेथे सभा घेतल्या त्याठिकाणाचे सर्व आघाडीचे उमेदवार पडले अपवाद रायगड, सातारा आणि बारामती. पण हे तीनही त्यांच्या वयक्तिक प्रभावामुळे निवडून आलेले आहेत त्यात राज यांच्या सभांचा काहीच प्रभाव नाही.

थोडक्यात काय तर मोदी आणि शाह जोडीसमोर सर्वच विरोधी पक्ष हतबल झाले. स्वातंत्र भारतात प्रथमच गैर काँग्रेस सरकार एवढ्या विक्रमी मताने दुसऱ्यादा निवडून आले आहे. मोदी यांना जगभरातून विविध अभिनंदनाचे संदेश आले यात प्रामुख्याने अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शिनपिग आणि इस्त्रायल चे प्रधान मंत्री यांचा समावेश होता. देशभरात भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून

तमाम भारतीयांचे लक्ष आता मोदी सरकार 2 यांच्या कामगिरी कडे असणार आहे. येत्या 28 मे रोजी मोदी यांचा शपथ विधी होवू शकतो अशी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते.