राज्यात कोरोनाचे नवे ८१ रुग्ण,पिंपरीसह पुण्यातही आणखी ३ पॉझिटिव्ह, कोरोना बाधीत आकडा ४१६ वर

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, आज राज्यात नवे ८१ रुग्ण आढळून आले. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, पिंपरीसह पुण्यात आज आणखी प्रत्येकी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे तीन रुग्णांचा राज्यात मृत्य झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या आता १९ वर पोहचली आहे.

राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आज नवीन ८१ जणांना कोरोनाची लागन झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कोरोनाबाधितांची राज्यातील आकडेवारी आता ४१६ वर पोहचली आहे. यामध्ये पुण्यात आज आणखी तीन जणांना कोरोची लागन झाली. पिंपरी चिंचवड येथेही कोरोनाचे ३ नवे रुग्ण आढळून आले. तर मुंबई येथे सर्वाधिक ५७ रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्यातील अहमदनगरमध्ये ९, ठाणे येथे ५ तर बुलढाणा येथेही १ रुग्ण आढळला आहे.त्याचवेळी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे