मुंबईत मुसळधार पावसामुळे CSMT- Vadala ही हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. मात्र वडाळा ते पनवेल आणि मेन लाईन, ट्रान्स हार्बर वरील सेवा मात्र सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
झालेल्या मुसळधार पावसात, मस्जिद स्टेशन जवळ पाणी भरल्याने, सुरक्षेच्या दृष्टीने हार्बर लाइन ची वाहतूक सीएसएमटी ते वडाळा स्टेशन दरम्यान दुपारी १.२० वाजलेपासून बंद केली आहे. बाकी सर्व ठिकाणी वाहतूक चालू आहे.